मुंबई - औद्योगिक परिसरातील व्यावसायिक गाळ्यांची उंची वाढवण्यासाठी 60 हजारांची लाच मागणार्या भाजपच्या नगरसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. वर्षा भानुशाली असे नगरसेविकेचे नाव आहे. भाईंदर परिसरात राहणार्या राधा हर्षद पारेख यांचा औद्योगिक परिसरात व्यावसायिक गाळा आहे. या गाळ्याची दुरुस्ती व उंची वाढवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पारेख यांनी पालिका नगररचना विभागाकडे परवानगी मागितली होती. या कामासाठी भानुशाली यांनी त्यांच्याकडे 60 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे पारेख यांनी भानुशाली यांची एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार ठरलेल्या दिवशी भानुशाली यांना लाच घेताना अटक करण्यात आली.