आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप उमेदवार प्रसाद लाड 210 कोटींचे मालक; पत्नीच्या नावे 48 कोटींची संपत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसाद लाड - Divya Marathi
प्रसाद लाड

मुंबई- विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अर्ज भरणारे प्रसाद लाड यांच्याकडे २१० कोटी ६२ लाखांची संपत्ती आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुुसार, लाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाखांची जंगम मालमत्ता आहे. यापैकी ३९ कोटी २६ लाख  शेअर्स व बाँडच्या स्वरूपात  गुंतवले आहेत. पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायलीकडे १ कोटी १५ लाख व मुलगा शुभमकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्याकडे ५६ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये पाथर्डी  तालुक्यातील  शेतजमीन, मुंबईतील सायन येथील प्लॉट, पुण्यातील  एरंडवणे येथील कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीतील सदनिका  व माटुंग्यात निवासी इमारत आहे. 

 
 नीता यांच्याकडे ५४ कोटी ९४ लाखांची स्थावर संपत्ती आहे. त्यात खालापूरची शेतजमीन, माटुंगाची व्यावसायिक इमारत, चेंबूरच्या  निवासी इमारतीचा समावेश आहे. लाड कुटुंबीयांकडे सामूहिक १० कोटी ४५ लाखांची स्थावर मालमत्ताही आहे. संपत्तीप्रमाणेच त्यांच्यावरील कर्जाचा आकडादेखील मोठा आहे. प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे ४२ कोटी २१ लाखांचे कर्ज आहे. मुलगी सायली हिच्या नावे १ कोटी ७ लाख तर मुलगा शुभम  याच्या नावे १८ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. लाड वर्षाला चार कोटी २२ लाख इन्कमटॅक्स भरतात, तर त्यांची पत्नी १ कोटी ८४ लाख आयकर  भरत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.   

 

श्रीमंत असल्याने उमेदवारी  

प्रसाद लाड हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते म्हाडाचे अध्यक्ष होते. लाड यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीत असताना विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. उद्योजक म्हणूनही त्यांची मुंबईत ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी लाड भाजपमध्ये आले.  श्रीमंत उमेदवार असल्याने प्रसाद लाड यांना भाजपकडून तिकीट मिळाले, असे बोलले जात आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने 21 कोटींचे मालक...  

 

हेही वाचा,

विधान परिषद निवडणूक: राणेंना ८ महिने ‘वेटिंग’, राष्ट्रवादीतून अालेल्या लाड यांना तिकीट

बातम्या आणखी आहेत...