आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-मनसेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, भाजपची महापौरपदासाठीच मोर्चेबांधणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या शिडात येथेही चांगलीच हवा भरली आहे. भाजपने शिवसेनेला बाजून ठेवून कल्याणमध्ये सत्ता स्थापन करण्याबरोबरच महापौरपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. संघर्ष समितीचे 9 व भाजपचे 42 असे मिळून त्यांची संख्या 51 पर्यंत जात आहे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असून महापौर भाजपचा असेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केले आहे. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी दानवे कल्याणमध्ये डेरेदाखल झाले आहेत. दानवेंच्या उपस्थितीत भाजपची मोर्चेबांधणी सुरु आहे. दुसरीकडे, शिवसेना व मनसेचे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत. तर सेना व मनसे नेत्यांत एकत्र येण्याबाबत मुंबईतील दादर परिसरात खलबतं सुरु आहेत.
दानवेंचे वक्तव्य शिवसेनेच्या पथ्यावर
कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद मिळवण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करेल. आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. आम्हाला 42 जागा मिळाल्या आहेत आणि संघर्ष समितीच्या 9 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमचे संख्याबळ 51 होते. त्यामुळे महापौरपद मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करू असे सांगत महापौर भाजपचाच असेल असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केल्यानंतर शिवसेना सावध झाली आहे. दानवेंचे हेच वक्तव्य शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. दानवेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानले जाते.
आमचा महापौर करू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात. याचाच अर्थ भाजपचा निर्णय झालेला आहे, त्यांना आमच्यासोबत यायचं नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही आमचा मार्ग निवडू असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवरच गुगली टाकली आहे. भाजपला आमच्यासोबत यायचे नव्हते म्हणूनच आम्हाला मनसे किंवा इतरांची मदत घ्यावी लागली असे स्पष्टीकरण द्यायला भविष्यात शिवसेना मोकळी झाली आहे. तसेही शिवसेनेला भाजपला सत्तेपासून दूरच ठेवायचे होते. (वाचा सविस्तर विश्लेणात्मक बातमी) मात्र, याबाबतचा निर्णय भाजपकडूनच आल्याने शिवसेनेची सुटका झाली आहे. शिवसेना व मनसेच्या नेत्यांत सत्ता वाटप सूत्रांबाबत अंतिम बोलणी सुरु असल्याचे कळते.
पुढे वाचा, शिवसेना-भाजपच्या रस्सीखेचीमुळे मनसेला भलतेच महत्त्व...