आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची आयोगाकडे अजित पवारांविरोधात तक्रार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड आणि परळीच्या विकासासाठी ठोस तरतूद करेन, असे आश्वासन देऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे.
अजित पवार यांनी केवळ बीड जिल्ह्याचा विकासच नव्हे तर परळी बायपाससाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना उपमुख्यमंत्र्यांनी मतदारांना आकर्षित करणारे वक्तव्य केल्याने तो आचारसंहितेचा भंग होता, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. या भाषणाची चित्रफीतही आपण आयोगाला देणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी 16 जानेवारी रोजी एका इंग्रजी दैनिकात विकास नियंत्रण नियमावलीवर लेख छापून आणल्याने भाजपचे मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारचा लेख आयुक्तांनी छापून मुंबईकरांचे मतपरिवर्तन होईल, असा आरोपही उपाध्याय यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.