आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंना उमेदवारी देऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले- गोपीनाथ मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महायुतीत सामील झालेले आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले असे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे.
रामदास आठवलेंना उमेदवारी देऊन भाजपने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. काँग्रेस पक्षाने 1950 दशकात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा मुंबईत व भंडा-यात पराभव केला होता. त्यावेळी तत्कालीन जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबडेकरांना बंगालमधून राज्यसभेवर पाठवले होते. त्यामुळे आठवले यांना संसदेत पाठविण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे मुंडे यांनी सांगितले. रामदास आठवलेंना महायुतीत घेताना बाळासाहेबांनी युतीकडून तुम्हाला राज्यसभेत पाठवले जाईल हे वचन दिले होते. भाजपने ते पूर्ण केल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी भाजपच्या केंद्रीय समितीचा निर्णय जाहीर करीत रामदास आठवलेंना भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले. आठवले आता एनडीएचे घटकपक्ष असतील, असे सांगितले. यावेळी बोलताना मुंडे यांनी सांगितले की, आमच्या केंद्रीय समितीने आठवले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून पक्षाचे महामंत्री अनंतकुमार यांनी फॅक्सद्वारे ही माहिती प्रदेश भाजप कार्यालयाला कळविली आहे.
रामदास आठवले यांना युतीतही फसविले जाणार असा प्रचार काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. मात्र, आम्ही हे सारे समज खोटे ठरविले आहेत. आठवलेंना आम्ही सन्मानाने महाराष्ट्रातही सत्तेत वाटा देणार आहोत. राज्यसभेच्या खासदारकीसोबत एनडीएमध्ये स्थान व सत्तेत वाटा हे आठवलेंसाठी डबल प्रमोशन आहे. काँग्रेसवाल्यांनी त्यांचा दिल्लीतील काढून घेतलेला बंगलाही त्यांना परत मिळणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
पुढे वाचा, अर्ज दाखल करण्यासाठी आठवले विधानसभा भवनात...