आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या राजीनाम्यावरून भाजपत संभ्रम, शिवसेनेत खुशीची गाजरे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकनाथ खडसेंच्या अनुपस्थितीत फडणवीस सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत खडसेंच्या राजीनाम्यावरून चकार शब्द निघाला नाही. सारे काही सामसूम होते. खडसेंचा राजीनामा न पचल्यामुळे भाजपचे मंत्री संभ्रमात, तर शिवसेनेचे मंत्री खुशीत गाजरे खाताना दिसत होते.
प्रकाश मेहता, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन हे पहिल्या फळीतील भाजपचे मंत्री बैठकीला हजर होते. पण यापैकी कोणीही फडणवीसांकडे खडसेंच्या राजीनाम्याविषयी चकार शब्द काढला नाही. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, पण खडसेंचे काय झाले? याविषयी कोणी काही बोलायला तयार नव्हते.
खडसेंना पायउतार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय, केंद्रीय कोअर कमिटीच्या विरोधाचा फारसा न झालेला विचार या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्यांमध्ये एकप्रकारची भीती दिसून येत हेाती. या विषयावर बोलण्यापेक्षा शांत राहून पुढे काय होते, हे पाहत राहायचे अशी सावध भूमिका घेताना भाजपचे पहिल्या फळीतील मंत्री दिसले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन तास खडसेच बोलत. त्यामुळे इतरांना गप्प बसण्यावाचून पर्याय राहत नव्हता. यामुळे भाजपसह शिवसेनेचे मंत्रीही वैतागले होते. खडसेंना सर्वच विषयात ज्ञान असले आणि बोलण्याचा वकूब असला तरी इतरांनाही संधी मिळाली पाहिजे, असे मत हे सर्वजण खाजगीत व्यक्त करीत असत. मुख्यमंत्रीही खडसेंच्या सबकुछ मीच या पावित्र्यामुळे त्रस्त होते. पण, त्यांनी तशी उघड नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र एखाद्या विषयावर दुसरे मंत्री बोलू लागले की फडणवीस त्यांना प्रोत्साहन देत. शिवसेनेचे रामदास कदम, दिवाकर रावते हे मंत्री आपले म्हणणे मात्र रेटून नेण्याचा प्रयत्न करत. खडसे नसल्याने आता आपल्याला मत मांडण्याची संधी मिळणार असल्याने इतरही मंत्र्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा.....
> वेळेत चौकशी करायची की नाही, हे फडणवीसांच्या हाती!
> मुख्यमंत्री-पंकजात प्रदीर्घ चर्चा
> खडसे यांचे दालन, रामटेक बंगला अन्य काेणाला मिळणार नाहीच!
बातम्या आणखी आहेत...