मुंबई- समृद्ध महाराष्ट्राची हमी देणारा 'दृष्टीपत्र' नावाचा जाहीरनामा भाजपने आज प्रकाशित केला. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आदी उपस्थित होते. भाजपच्या जाहीरनाम्यातून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गायब झाला आहे.
कसा आहे भाजपचा जाहीरनामा वाचा...
- महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा आणणार
- माहिती तंत्रज्ञान उदयोग विकास प्राधिकरण स्थापणार
- उद्योग क्षेत्राच्या सुलभतेसाठी एक खिडकी योजना राबविणार
- वयोवृद्ध शेतक-यांसाठी अन्नदाता आधार योजना
- माहेरचा आधार ही पेन्शन योजना
- पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार
- राज्यात इव्हिनिंग (संध्याकाळचे) कोर्ट सुरू करणार
- मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार
- सरकारी कार्यालयात एक खिडकी योजना आणणार
- डॉ. आबेडकरांचे स्मारक तत्काळ उभारणार
- वृद्ध श्रमिक पत्रकारांना मासिक 1500 रूपये मानधन देणार
- ठिंबक सिंचनाला 50 टक्के अनुदान देणार.