आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप एक जुलै राेजी उद्धव ठाकरेंना भेट देणार फायबरचा सहा फुटी वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून देण्यासाठी आणलेल्या वाघाला लवकरच मुहूर्त सापडणार आहे. १ जुलै राेजी हा वाघ आणि दोन कोटी वृक्ष लागवडीचे निमंत्रण लखोट्यासह उद्धव ठाकरे यांना दिले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वनमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात हा फायबरचा सहा फुटी वाघ तयार करुन घेतला हाेता. मात्र युतीतील तणाव वाढत असल्याने अद्याप हा वाघ ‘माताेश्री’वर भेट देण्यास भाजपला वेळ मिळालेला नाही. एक जून रोजी वाघ दिला जाईल, असे वनमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु एक जूनचाही मुहूर्त टळला. उद्धव ठाकरे परदेशात असल्याने या दिवशी वाघ देता आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढे वाचा...
>याबाबत मुनगंटीवार यांनी सांगितले,
>बदलीचा घोळ सुरूच; सहा सनदी अधिकाऱ्यांना नव्याने नियुक्त्या
बातम्या आणखी आहेत...