आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप ‘फ्लॅश मॉब’द्वारे मतदारांना खेचणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या वर्षापासून मुंबईमध्ये सुरू झालेल्या ‘फ्लॅश मॉब’ फंड्याचा वापर भाजपतर्फे महापालिका निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईकरांना ‘फ्लॅश मॉब’ परिचित झाला असून धावपळीच्या वेळेत व गर्दीच्या ठिकाणी शेकडो लोक अचानक एकत्र जमून नृत्य-गाणे सादर करतात, या अनोख्या प्रकाराचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
हीच कल्पना भाजपच्या नेत्यांना भावली असून ते फ्लॅश मॉबचा वापर मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी करणार आहेत. फोन, एसएमएस, पत्रके, टीव्हीवरील जाहिराती ही प्रचाराची माध्यमे आता जुनी झाली आहेत. लोकांना आकर्षित करायचे तर काही नवीन प्रचार तंत्र लागेल, याचा विचार केला जात होता. तरुणांना भावणारी ‘फ्लॅश मॉब’ची कल्पना नक्कीच मतदारांना आवडेल, असा विश्वास भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केला. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘कोलावरी’च्या धर्तीवर खास गाणे तयार केले आहे. मग तसेच काहीतरी गाणे वगैरे लिहिले तर त्यांची कॉपी केल्यासारखे होईल. त्यामुळे वेगळे काहीतरी करून दाखवण्याचे भाजप नेत्यांच्या मनात असल्याचे दिसते.
नोव्हेंबर महिन्यात दोनशे तरुणांनी एकत्र जमून सीएसटी स्टेशनला 'रंग दे बसंती' या गाण्यावर ठेका धरला आणि मुंबईला प्रथमच फ्लॅश मॉबची ओळख झाली. ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साइटवरून त्यांनी तरुणांना आवाहन करून नृत्याची तालीम केली आणि मग हे सादरीकरण केले. मात्र पाहणाºयाला हे लोक ऐनवेळी जमल्यासारखे वाटत होते. भाजपतर्फे असेच सोशल साइटवरून आवाहन करण्यात येईल. मात्र यावेळी कोणत्याही बॉलीवूडच्या गाण्यावर न नाचता भाजपच्या प्रचाराची गाणी पाहणाºयांना ऐकवली जातील. सध्या या फ्लॅश मॉबसाठी ठिकाण निश्चित झाले नसून लवकरच ते जाहीर करण्यात येईल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.