आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार राज पुरोहितांना स्टिंग प्रकरण भोवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या नेत्यांबाबात अतिशय वादग्रस्त िवधाने केल्याप्रकरणी आमदार राज पुरोहित यांना पक्षाकडून शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पुरोहित यांच्यावर पक्षातून निलंबन वा कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांनी कथित चित्रफितीत पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. पुरोहित यांनी तीन दिवसांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे यासंबंधीचे लेखी स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश भाजपकडून देण्यात आला आहे. पुरोहित यांनी तीन दिवसांत या नोटिसीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारीच याप्रकरणात तथ्य आढळल्यास पुरोहितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
तो माझा आवाज नव्हेच : पुरोहित
राज पुरोहित यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. "स्टिंग ऑपरेशन'च्या व्हिडिओमध्ये माझ्या तोंडी दुसर्‍याच कुणाचा आवाज घालण्यात आला आहे, तो आवाज माझा नव्हे,' असा खुलासा त्यांनी केला आहे. पुरोहित यांचा सनसनाटी स्टिंग व्हिडिओ शुक्रवारी सर्वत्र प्रसिद्ध झाला. यात पुरोहित पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वोच्च नेत्यांविरुद्ध, सरकारच्या धोरणाविरुद्ध जहरी टीका करताना दिसत आहेत.