मुंबई- गणेशोत्सव चार-पास दिवसांवर येऊन ठेवून ठेपला आहे. त्यात मुंबई पोलिसांचा अजब फतवा पाहून गणेश मूर्तीकार चांगलेच चक्रावले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांना गणरायाची मूर्ती कारखाण्यातून दिवसा नेता येणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी गणेश मूर्तीकारांनी नोटीसही पाठवली आहे. दिवसा मूर्ती बाहेर निघाल्यास वाहतूककोंडी होत असल्याने हा आदेश पोलिसांनी दिला आहे.
गणेश मूर्तीकार विजय खातू, राहुल घोणे, राजन खातू या तीन मूर्तीकारांना पोलिसांनी ही नोटीस दिली आहे. सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्ती रात्री 9 नंतरच कारखान्यातून नेता येईल. गणेशमूर्ती कारखान्यामधून दिवसा निघाली तर मूर्तीकारांना जबाबदार धरण्यात येईल, असे देखील पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मांसबंदीला विरोध मुंबईत शेलार विरुद्ध शिवसेना असा जुना संघर्ष सुरु...