आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयश झाकण्यासाठी गोंधळ; भाजपचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलग तीन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणारे विरोधक गुरूवारी कामकाजात सहभागी हाेऊन याविषयावर चर्चा करणार अाहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधकांचा प्रस्ताव गुरुवारी दाेन्ही सभागृहात चर्चेला येणार आहे. विधिमंडळात मंगळवारी सत्ताधाऱ्यांचे तर गुरूवारी विरोधकांचे प्रस्ताव चर्चेला येत असतात. त्यामुळे गुरूवारी विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे विरोधी पक्षांतर्फे सांगण्यात आले. कर्जमाफीवर बुधवारी सत्ताधाऱ्यांनी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्री नवी दिल्लीत महत्वाच्या बैठकांना गेल्यामुळे विरोधकांनी बुधवारीही बहिष्कार कायम ठेवला हाेता. काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या अामदारांनी दिवसभर विधानभवन परिसरात टाळ कुटून, भजने गात सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनाचे चित्रिकरण करण्यास रोखण्याचा प्रयत्न विधिमंडळ प्रशासनातर्फे करण्यात आला. त्याच्या निषेधार्थही घाेषणाबाजी केली.
दरम्यान, पुरवणी मागण्यांमध्ये एलबीटीसाठी २०९८ कोटी रुपये मोजण्याचे औदार्य दाखविणारे सरकार मनाचा असाच मोठेपणा शेतकऱ्यांसाठी का दाखवत नाही, अशी विचारणा करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला.
बातम्या आणखी आहेत...