आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Eknath Khadase Comment On Shiv Sena And BJP Alliance

खडसेंचे बोल: सत्ता सोडण्याची चूक पुन्हा नाहीच, सेनेशी जुळवून घेण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘यापूर्वी केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना काही कारणास्तव सत्ता सोडण्याचे निर्णय घेण्यात आले. पण त्याचा फटका आम्हाला बसला आणि पुन्हा सत्तेत यायला पंधरा वर्षे लागली. हा अनुभव लक्षात घेता आता पुन्हा सत्ता सोडण्याची चूक करणार नाही,’ महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांमध्ये भाजप शिवसेनेमधील वादांमुळे सरकार अस्थिर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी भाजप यापुढेही शिवसेनसोबत जुळवून घ्यायला तयार असल्याचे संकेत माध्यमांशी बोलताना दिले आहेत.

‘सद्य परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूका नको आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे सरकार पडण्याचा कोणताही धोका नाही आणि राजकीयदृष्ट्या ते परवडणारे सुद्धा नाही. युतीत सध्या वाद असला तरी तो किरकोळ आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे,’ असेही खडसेंनी स्पष्ट केले. सन १९७८ला पुलोद सरकारमध्ये पूर्वीच्या जनसंघ या नावाने आम्ही सहभागी झालो होतो. ते सरकार गेले आणि आम्हाला सत्तेत येण्यासाठी सन १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. दिल्लीत सन १९७७ मध्ये जनता सरकार गेले आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीची गादी मिळवण्यासाठी सन १९९६ साल उजाडावे लागले. सन १९९९ मध्ये आम्ही काही कारणाने राज्याची सत्ता लवकर सोडली. त्यानंतर पुन्हा सत्ता मिळवण्यास १५ वर्षे लागली. हा अनभुव गाठीशी असल्याने त्यामधून आम्ही बरेच िशकलो आहे. त्यामुळे अशी चूक पुन्हा करणार नाही,’ असेही खडसेंनी सांगितले.

युती तोडणाऱ्या खडसेंचे आता ‘आस्थे कदम’
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेबरोबर २५ वर्षांची युती तोडण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि त्याबद्दल मला खेद वाटत नाही. युतीत आता आम्ही मोठे भाऊ आहोत, त्यामुळे मागे काय झाले आणि काय होते, याचा भाजप विचार करत नाही, असे वारंवार सांगत खडसेंनी वारंवार शिवसेनेला डिवचले होते. मात्र आता राज्यात भाजपचे सरकार अस्थिर होत आहे, अशी चिन्हे दिसताच त्यांनी शिवसेनेसोबत जुळवून घेत पुन्हा मैत्रीचा सूर आळवला आहे.