आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIDC प्रकल्पांबाबत एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर, विरोधकांसोबत नवी खेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या ना त्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यात आता भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. एमआयडीसी प्रकल्पांबाबत माहिती का दिली जात नाही? असा सवाल करत एकनाथ खडसेंनी नवी खेळी सुरु केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी खडसेंना समर्थन दिल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले खडसे...
1995 पासून एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या किती जमिनी संपादित केल्यात किती परत केल्यात याची मी वर्षभरापासून माहिती मागितली होती. पण माहिती अजूनही मिळाली नाही. सरकार ही माहिती का देत नाही, सरकार काही लपवालपवी करत आहे का? असा सवाल खडसेंनी केला आहे. एका महिन्यात ही माहिती मला मिळाली पाहिजे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी सरकारला खडसावले आहे.

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर लाचखोरीचा आरोप असलेले एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती उचलबांगडी केली आहे.

'पीएमओ'ने मागितली मोपलवारांच्या मालमत्तेची माहिती...
राधेश्याम मोपलवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा संशय असून त्यांची माहिती आम्हाला द्या, असे पंतप्रधान कार्यालय (‍पीएमओ) मागितली आहे. याबाबत आयकर विभाग तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने डिसेंबर 2016 पासून सातत्याने राज्याकडे विचारणा करत होते. पण शेवटपर्यंत यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... एकनाथ खडसेंचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती
बातम्या आणखी आहेत...