आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : स्‍वत:च्‍या मुलाला बसवून पेटवला ऑटो, नंतर पोलिसांना बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गफ्फारने पेटवून दिलेला ऑटो - Divya Marathi
गफ्फारने पेटवून दिलेला ऑटो
औरंगाबाद - येथील रेल्‍वे स्‍थानक परिसरात आज आज (मंगळवारी) एका ऑटोचालकाने 'नो पार्किंग झोन'मध्‍ये ऑटो उभा केला. त्‍यातून त्‍याचा वाहतूक पोलिसासोबत वाद झाला. दरम्‍यान, ऑटो चालकाने आपल्‍या मुलाला ऑटो बसवून तो पेटवला. दरम्‍यान, पोलिसांनी प्रसंगावधान राखून मुलाला ऑटोतून ओढले. नंतर ऑटोचालकाने आपल्‍या भावाला बोलावून वाहतूक पोलिसांना मारहाण केली. यात एक पोलिस गंभीर जखमी झाला. शेख गफ्फार असे त्‍या ऑटो चालकाचे नाव आहे.

अशी घडली घटना
नो पार्किंगमध्‍ये ऑटो उभा केल्‍याने एका वाहतूक पोलिसासोबत गफ्फार नावाच्‍या ऑटोचालकाचा वाद झाला. दरम्‍यान, पोलिस आपल्‍याला हप्‍ता मागतात. हप्‍ता दिल्‍यानंतरही मानसिक त्रास देतात, असा आरोप करत स्वतःच्या मुलाला ऑटोत बसवून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुलाला ऑटोबाहेर काढले. यानंतर भावाच्‍या मदतीने पोलिसांना मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्‍यान, गफ्फार हासुद्धा जखमी झाला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा,
- शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने केला गुन्‍हा दाखल
- मारहाण करण्‍या-या दोन महिला पोलिस निलंबित, पाहा VIDEO
- औरंगाबादमध्‍ये ऑटोची दुचाकीस धडक, आजी नातू जखमी
- मुंबई विमानतळावर बॉम्‍ब ठेवल्‍याचा निनावी फोन, हाय अलर्ट
- प्रवीण दीक्षित होणार महाराष्‍ट्राचे नवे पोलिस महासंचालक
- समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगवर ३ ऑक्टोबरला सुनावणी
- अंदमान-निकोबारचे माजी नायब राज्यपाल राम कापसेंचे निधन
यासह दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या , पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा...