आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Says People Can Get Food For Only Rs. 5 In Mumbai

भिकार्‍यांकडे इशारा करत भाजप नेते वदले, \'मुंबईत पाच रुपयांतही पोटभर जेवण मिळते\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महागाई आकाशाला भिडायला निघालेली असताना कमी किंमतीत पोटभर जेवण मिळते यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेलार यांचे म्हणणे आहे की, मुंबईत केवळ 5 रूपयांत पोटभर जेवण मिळते. जेव्हा शेलार यांना विचारले तेव्हा असे जेवण कुठे मिळते तेव्हा माहिम दर्ग्याजवळ बसणा-या भिखा-यांचा संदर्भ देत तसा इशारा केला. माहिम दर्ग्याजवळ एका स्वयंसेवी संस्थेमार्फत भिखा-यांना जेवण उपलब्ध करून दिले जाते.
शेलार यांचे वादग्रस्त वक्तव्य- भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान महागाईवरून शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, ही मुंबई आहे. इथे एकीकडे महागडी हॉटेल व रेस्टोरंट आहेत तर दुसरीकडे फक्त 5 रूपयांत पोटभर जेवण मिळते. मुंबई गरीबी आणि श्रीमंतीचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
मुंबईत साधा एक वडापाव 12 रूपयांना आहे तर पाणीपुरीची प्लेट 20 रूपयांना मिळते. अशा मुंबईत 5 रूपयांत पोटभर जेवण कुठे मिळते असे विचारले असता ते म्हणाले, गरीबांना 5 रूपयांत जेवण मिळू शकते. त्यांना माहिममधील दर्ग्याजवळही जेवण मिळू शकते जेथे काही लोक 2 ते 5 रूपयांत पोटभर जेवण देतात. माहिम दर्ग्याजवळ काही स्वयंसेवी संस्था अंध, अपंग व भिखा-यांना 5 रूपयांत जेवण उपलब्ध करून देतात. माहिम दर्ग्याला रोज लाखो लोक भेट देतात. त्यामुळे अंध, भिखारी, अपंग लोक तेथे भिख मागून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे काही दानशूर लोकांनी अशा लोकांना तेथे जवळच स्वस्तात जेवण उपलब्ध करून दिले आहे. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी देशातील व मुंबईतील सर्वसामान्यांना महागाईने काही खरेदी करू शकत नसाल तर दर्ग्याजवळ जेवायला जाण्याचा सल्ला दिला आहे.
शेलारांचे घुमजाव- दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो ही बाब लक्षात येताच शेलार यांनी घुमजाव केले आहे. मी पोटभर जेवणाचा उल्लेख केलेला नाही. मला एवढेच सांगायचे होते की मुंबई सगळ्यांसाठी आहे. येथेही कोणीही राहू शकतो व जीवन जगू शकतो. माझ्या वक्तव्याचा अर्थ वेगळा काढला जावू नये. मी मुंबईतील स्थितीबाबत भाष्य केले आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार (संग्रहित छायाचित्र)