आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्षात ठेवा, शूर्पणखेप्रमाणे तुमचे नाक कापू; भाजप नेत्याची ममता बॅनर्जी यांना धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण हिने पद्मावती चित्रपटात राणीची भूमिका निभावली आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
दीपिका पादुकोण हिने पद्मावती चित्रपटात राणीची भूमिका निभावली आहे. (संग्रहित फोटो)

मुंबई- ‘पद्मावती’ सिनेमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शूर्पणखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी या भाजप नेते सूरजपाल अमू यांनी दिली आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे मुंडके कापणाऱ्याला दहा कोटींचे बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी केली होती.

 

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या चमूचे पश्चिम बंगालमध्ये स्वागत केले जाईल आणि या चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रदर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हटले होते.

 

‘या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद म्हणजे देशातील विचारस्वातंत्र्य नष्ट करण्याची सुनियोजित योजना आहे, असे ट्विट बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. भन्साळी आणि त्यांचा चमू ‘पद्मावती’ चित्रपट अन्य कोणत्याही राज्यांत प्रदर्शित करू शकले नाहीत तर आम्ही त्यासाठी पश्चिम बंगालमध्ये विशेष व्यवस्था करू. बंगालला त्याचा अभिमान आणि आनंदच वाटेल, भन्साळी आणि त्यांच्या चमूचे आमच्या राज्यात स्वागत आहे,’ असे बॅनर्जी म्हणाल्या होत्या.


‘पद्मावती’चा वाद केवळ दुर्दैवीच नाही तर विचारस्वातंत्र्याची गळचेपी करण्याची एका राजकीय पक्षाची सुनियोजित योजना आहे. आम्ही या महाआणीबाणीचा निषेध करतो, असे बॅनर्जी यांनी ट्विट केले होते.

 

काय म्हणाले सूरजपाल अमू 

‘राक्षसी प्रवृत्तीच्या काही महिला असतात. ज्यामध्ये रावणाची बहिण शूर्पणखा होती. शूर्पणखाचे नाक कापून लक्ष्मणाने तिला धडा शिकवला होता. ममताजींनी ही गोष्ट विसरु नये,’ असे वक्तव्य हरियाणा भाजपचे मुख्य माध्यम समन्वयक सूरजपाल अमू यांनी केले. ‘पद्मावती’ सिनेमाला राजस्थानातील राजपूत समाजाच्या करणी सेनेने विरोध दर्शवला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...