आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक गावात शेतकऱ्यांशी भाजप नेते संवाद साधणार; दानवेंच्या वक्तव्याचे पडसाद?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने २५ ते २८ मेदरम्यान राज्यातील प्रत्येक गावात शिवार संवाद सभेचे अायाेजन केले अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत.  

कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या संवाद सभांचे नियोजन करत आहेत. या संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी गुरुवारी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम रविवारी पूर्ण होईल, तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये, तर प्रदेशाध्यक्ष दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद करतील. त्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील.  

दानवेंच्या वक्तव्याचे पडसाद ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा अाराेप हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध संघटनांमधून संताप व्यक्त हाेत अाहे. खासकरून विराेधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीसह सत्ताधारी शिवसेनेनेही त्यांच्या विराेधात ठिकठिकाणी अाक्रमक अांदाेलन सुरू केले अाहे. भाजपच्या संवाद यात्रेत या अांदाेलनाचे काही पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...