आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतगावकर, बाेराळकर, मुंडे भाजप प्रदेश कार्यकारिणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपली पहिलीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, यात मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या स्पर्धेत असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांची सरचिटणीसपदी वर्णी लावण्यात आली आहे. याच पदावर उस्मानाबादचे सुजितसिंह ठाकूरही आहेत. काँग्रेसमधून आलेले भास्करराव पाटील खतगावकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. याशिवाय दानवे यांच्याखेरीज मराठवाड्यातील लातूरचे गोविंद केंद्रे उपाध्यक्ष, औरंगाबादचे मनोज पांगारकर चिटणीस, ज्ञानोबा मुंडे शेतकरी आघाडी अध्यक्ष झाले आहेत. प्रवक्तेपदी औरंगाबादचे शिरीष बोराळकर, गणेश हाके यांनाही संधी मिळाली आहे.
नवेजिल्हाध्यक्ष : अहमदनगरग्रामीण - भानुदास बेरड, जालना - रामेश्वर भांदरगे, लातूर - शैलेश लाहोटी,परभणी शहर- आनंद भरोसे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.
पक्षांतरकेलेल्यांना पदे : खतगावकरांसह,काँग्रेसचे माजी आमदार नाना पटोले, एकेकाळचे राणेसमर्थक राजन तेली, मनसेतून आलेले राम कदम यांनाही स्थान मिळाले. संबंधित.पान