आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, मंत्रिपदाच्या स्पर्धकांची बोळवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली अाहे. त्यात मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या स्पर्धेत आघाडीवर असलेले चैनसुख संचेती, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, सुनील देशमुख यांचा समावेश झाल्याने हे नेते अाता मंत्रिपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांचे विश्वासू मानले जाणारे प्रा. रवींद्र भुसारी यांची सरचिटणीस पदावर फेरनियुक्ती झाली, तर कोशाध्यक्षपद शायना एन.सी. यांच्याकडे साेपवले अाहे. उपाध्यक्षपदावर विदर्भातील आमदार चैनसुख संचेती, डॉ. सुनील देशमुख, खासदार नाना पटोले, आमदार सुधाकर देशमुख यांची वर्णी लागली. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर मंगल प्रभात लोढा यांना उपाध्यक्ष केल्याने त्यांचीही मंत्रिपदावरील दावेदारी संपुष्टात आली आहे. लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नाव मंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होते. मात्र, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला मराठवाड्यात अन्य कुणी स्पर्धक उभा राहू नये म्हणून त्यांची उपाध्यक्षपदावर बोळवण केली.

अशी आहे कार्यकारिणी
उपाध्यक्ष : चैनसुख संचेती, सुनील देशमुख, सुधाकर देशमुख, नाना पटोले, मंगल प्रभात लोढा, सुभाष देशमुख, नीता केळकर, सुरेश खाडे, भास्कर खतगावकर, कांताताई नलावडे, गोविंद केंद्रे, भागवत कराड, बाळासाहेब गावडे, शिवाजी कांबळे.

सरचिटणीस: सुजितसिंहठाकूर, संभाजी पाटील निलंगेकर पाटील, अतुल भातखळकर, डॉ. रामदास आंबटकर

चिटणीस: योगेश गोगावले, डॉ. विनय नातू, मंजुळा गावित, अतुल भोसले, स्मिता वाघ, नरेंद्र पवार, मायाताई इवनाते, स्नेहलता कोल्हे, राजन तेली, अर्चना वाणी, मनोज पांगारकर आणि संजय पांडे

प्रवक्ते: माधव भंडारी, मधू चव्हाण, राम कदम, केशव उपाध्ये, प्रा. सुहास फरांदे, गिरीश व्यास, शिरीष बोराळकर आणि गणेश हाके

आघाड्या: युवा मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष - माधवी नाईक, अनुसूचित जाती अध्यक्ष - सुभाष पारधी, आदिवासी मोर्चा अध्यक्ष अशोक नेते, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष -जमाल सिद्दिकी, शेतकरी आघाडी अध्यक्ष - ज्ञानोबा मुंडे.

पक्षांतर केलेल्यांना महत्त्वाची पदे
निवडणुकीच्यातोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे माजी आमदार नाना पटोले, नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली, मनसेतून भाजपत आलेले राम कदम यांचीही भाजपच्या कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्यात अाली अाहे.