आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे आजपासून पुण्यात राजकीय चिंतन; प्रदेश कार्यकारिणी बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवार रविवारी पुण्यात होत असून या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर िचंतन होणार आहे. याचबरोबर मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका, िजल्हा परिषद, पंचायत समितीच्या िनवडणुकांची तयारी हा या बैठकीतील प्रमुख िवषय असणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी िदली.

पुण्यातील बालगंधर्व येथे होणाऱ्या या बैठकीला मंत्री, खासदार, अामदार, पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातून एक हजार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शनिवारी बैठकीचे उद््घाटन हाेणार अाहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी समारोपाच्या िदवशी मार्गदर्शन करतील. अलाहाबादला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर सात िदवसांनी राज्य प्रदेश कार्यकारिणी आयोजित करणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे ही बैठक होत असून त्यानंतर सात िदवसांनी िजल्हा, तर पुढील सात िदवसांत तालुका कार्यकारिणी होईल.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रिपद सोडावे लागले होते, तर जलसंपदामंत्री िगरीश महाजन यांच्यावरही जमीन घाेटाळ्याचा अाराेप झाला अाहे. िगरीश बापट, िवनोद तावडे या मंत्र्यांच्या मागचा वादाचा ससेमिरा काही सुटत नाही. भ्रष्टाचाराबरोबरच प्रशासनावरील िढली होत चाललेली पकड हा फडणवीस सरकारसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यातच भर म्हणून की काय िमत्रपक्ष िशवसेनेकडून होत असलेली बोचरी टीका भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहेे. िवरोधकांपेक्षा िवरोधकाचे काम शिवसेना करत असल्याने भाजपची अवस्था ‘धरले तर चावते अाणि सोडले तर पळते’ अशी झाली आहे. या सर्व प्रश्नांची कार्यकारिणीवर छाया आहे.

निवडणूक तयारीवर चर्चा अपेक्षित : दानवे
‘सध्याच्याराजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार असली तरी भ्रष्टाचाराचे आरोप, िशवसेना हे िवषय चर्चेला येणार नाहीत. यावर िचंतन होते ते पक्षाच्या कोअर बैठकीत. राजकीय प्रश्नांबरोबर कृषी धोरण यावर कार्यकर्ते आपले मत मांडतील. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली अाणि आता उरलेल्या माहितीमध्ये तयारीची काय िदशा असेल यावर चर्चा होईल,’ असे दानवे यांनी सांिगतले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...