आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - माढा आणि बारामतीच्या जागांवरून महायुतीत निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. माढा मतदारसंघासाठी अडलेले महादेव जानकर अखेर बारामतीत लढण्यास राजी झाले आहेत. माढय़ाची जागा पदरात पाडून घेण्यात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी अखेर विजयी झाले असून, या पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांना तेथून रिंगणात उतरवले जाईल.
शेट्टी, जानकर हे संतुष्ट झाले असले तरी रामदास आठवले मात्र नाराज आहेत. दोन जागा मागणार्या आठवले यांना अद्याप एकच जागा दिली आहे. शनिवारी ‘मातोर्शी’वर माढा व बारामतंबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, महादेव जानकर, रामदास आठवले व अन्य नेते उपस्थित होते. माढय़ामधून सदाभाऊ यांची राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी थेट लढत होणार आहे. याशिवाय विजयसिंह यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.