आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Ministers Not Individually Make Appointments Raosabheb Danave

भाजप मंत्र्यांनी परस्पर नियुक्त्या करू नयेत, रावसाहेब दानवे यांनी पत्राद्वारे सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप व शिवसेनेमधील मंत्र्यांमध्ये अधिकारावरून निर्माण झालेला वाद चव्हाट्यावर आला असताना आता भाजपअंतर्गत आधीच असलेला फडणवीस-खडसे यांच्यातील वाद नव्याने उफाळून आला आहे. त्याला निमित्त ठरले ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्ररूपाने या वादात घेतलेल्या उडीचे. ‘भाजपच्या मंत्र्यांनी महामंडळ तसेच समित्यांवर परस्पर नियुक्त्या करू नयेत. त्याची यादी आधी प्रदेश कार्यालयाला कळवायला हवी,’ अशी तंबीच दानवे यांनी या पत्रात दिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या कार्यालयाला हवे असलेले अधिकारी देत नाहीत. प्रस्ताव रोखून ठेवत असल्याने खडसे मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. काही दिवस जाहीर अबोला धरत ही नाराजी त्यांनी दाखवून दिली होती. मुख्यमंत्री आपले ऐकत नसल्याचे लक्षात येताच खडसेंनी आपल्या मुक्ताईनगरमधील रहिवासी असलेल्या तसेच मर्जीतील मोहंमद हुसेन खान यांची राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावर परस्पर नियुक्ती केली. १५ जानेवारीला खान यांची निवड करण्यात आली आहे. खरेतर कुठल्याही आयोगाचा अध्यक्ष नियुक्त करायच असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता खडसेंनी परस्पर नियुक्ती केल्याचे सांगितले जाते.

फडणवीस-खडसे यांच्यातील वादाचा परिणाम होऊन भाजपमधील इतरही मंत्री आपल्याला हवे तसे वागायला लागतील. मुख्यमंत्र्यांना ते दाद देणार नाहीत. यामुळे सावध झालेल्या प्रदेशाध्यक्ष दानवेंनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना पत्र लिहून परस्पर नियुक्त्या न करण्याची तंबी दिली आहे.

पुढे वाचा, मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांवर वचक नाही : काँग्रेस