आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप मंत्र्यांचे घोटाळे शिवसेेना बाहेर काढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने मोहीम सुरू केली असतानाच आता सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही अापल्या मित्रपक्षाविराेधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत आमच्याकडेही भाजप मंत्र्यांचे घोटाळे आहेत ते बाहेर काढावे लागतील, असा इशारा काही आमदारांनी दिला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आक्रमक व्हावे लागेल आणि संपूर्ण कर्जमाफी मिळावी, असा सूरही बैठकीत काही आमदारांनी काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले, ‘अनेक आमदारांनी भाजप मंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर लावला. हे मंत्री केवळ भाजपच्याच आमदारांचीच कामे करतात, अशी तक्रार करत मतदारसंघातही भाजप मंत्री अडवणूक करत असल्याचेही आमदारांनी म्हटले. पारनेर मतदारसंघात तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, असे सांगून आपले राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार विजय औटी यांनी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राठोडांची नाराजी काय
राज्यमंत्री संजय राठोड यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रारींचा सूर लावला. मला अजूनही जादा अधिकार दिलेले नसल्याचे ते म्हणाले. तेव्हा एका आमदाराने, जर मंत्र्यांची ही स्थिती असेल तर आमची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित केला. कामे होणार नसतील तर आम्हालाही मंत्र्यांविरोधात आक्रमक व्हावे लागेल. तीन लाखांवरील कामांसाठी ई-टेंडरिंग केल्याने आमदार निधीची कामे होण्यास वेळ लागत असल्याचे सांगत कार्यकर्ते नाराज असल्याचे काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी बोलून दाखवले.