आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराची फेरीवाल्यांना शिवीगाळ, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आमदार अमित साटम यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. - Divya Marathi
भाजप आमदार अमित साटम यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई- भाजप आमदार अमित साटम यांनी फेरीवाल्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत साटम पोलिस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत.
 
अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण करत असल्याचा साटम यांचा आरोप आहे.  तर फेरीवाल्यांनी मात्र अमित साटम आपल्याकडून हप्त्यांची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. दुसरीकडे सामान्य मुंबईकरांकडून पदपथ हे नेमके फेरीवाल्यांसाठी आहेत की पादचाऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याविषयावर भूमिका घेताना संयम राखण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...