मुंबई- सत्ता नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस बेचैन आहे. म्हणूनच जातीय विद्वेष पसरवून त्यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत. अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत केला.
सांगलीतील सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी गोटे यांनी केली. शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आव्हाड यांना आहे. मात्र यानिमित्ताने जातीयता पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न चुकीचा आहे, असा मुद्दा गोटे यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी सांगलीच्या कार्यक्रमात उधळलेल्या मुक्ताफळांची चाैकशी करावी,’ अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी, ‘अाव्हाड हे केवळ अामदार अाहेत म्हणून नव्हे तर काेणालाही धाेका असल्यास सरकार गांभीर्याने लक्ष देईल,’ असे उत्तर दिले.