आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हाड यांच्याविरोधात हक्कभंग, विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा राम कदमांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात विधानसभा अध्यक्षांचा अवमान करणारे शब्द वापरल्याने भाजपा आमदार राम कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. राम कदम यांनी सांगितले, ‘मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात आम्ही दोघे एकत्र होतो. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा अवमान करणारा एक शब्दप्रयोग केला. असे करणे योग्य नाही,’ असे सांगत आव्हाड यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...