आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP आमदार राम कदम यांनी अल्पवयीन मुलाला भेट दिली मर्सिडीज, सोशल मीडिया भडकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एकिकडे नोटाबंदी जाहीर केल्यानंतर मध्यमवर्गीयांच्या हातातील पैसा निघून गेला असताना दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी अल्पवयीन मुलाला वाढदिवसाला चक्क मर्सिडीज भेट दिल्याचे चांगलाच गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे ही बातमी स्वतः कदम यांनी मुलाच्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात राहणारे कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
- नोटाबंदी झाल्याने सर्वसामान्यांच्या हातातील पैसा निघून गेला आहे. त्यामुळे एटीएम आणि बॅंकांसमोर लोकांच्या रांगा दिसून येत आहेत. या दरम्यान आमदार राम कदम यांनी मुलााच्या वाढदिवशी मर्सिडीज (E350 Cabriolet) भेट दिली आहे.
- 19 नोव्हेंबर रोजी ट्विटर आणि फेसबुकवर राम कदम यांनी मर्सिडीजसोबत मुलाचा फोटो शेअर केला. 'माझा लाडका अरुण कदम याला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. माझ्याकडून तुला ही सुंदर भेट.'
- त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया टाकण्यास सुरवात केली. त्यात लोकांनी नाराजी सरळ दिसून येत होती.
- कार चालवण्यासाठी लायसन्सची गरज असते. त्यांचा मुलगा 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. त्याला ही कार कशी काय भेट दिली, असा प्रश्नही काही लोकांनी विचारला आहे.
आधीही बऱ्याच वेळा वादात राहिले आहेत कदम
- राम कदम घाटकोपर वेस्ट येथून भाजपचे आमदार आहेत.
- 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर कदम पहिल्यांदा आमदार झाले होते.
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि जिंकून आले.
- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीतून शपथ घेतल्याने मनसेच्या आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यात कदम यांचा समावेश होता.
- बीएमसीच्या कर्मचाऱ्याला कानशिलात लावल्यानेही कदम चर्चेत आले होते.
- कदम प्रत्येक वर्षी घाटकोपरमध्ये विशाल दहिहंडी आयोजित करतात. त्यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलवतात.
पुढील स्लाईडवर बघा, सोशल मीडियावर आलेल्या रिअॅक्शन....
बातम्या आणखी आहेत...