आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भाजप आमदाराची भरधाव गाडी चक्क पोलिस चौकीत घुसली, हेड कॉन्स्टेबल जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांची भरधाव गाडी (महिंदा एक्सयूव्ही) थेट ट्रॅफिक पोलिस चौकीला घसल्याची घटना घडली.  ही घटना काल (गुरुवारी) रात्री नाहूर येथील सोनापूर सिग्नल जवळ घडली. भरधाव वेगातील गाडीने स्विफ्ट गाडी आणि दुचाकीला धडक दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघात झाला तेव्हा तारा सिंग यांचा चालक महेंद्र गुप्ती ही गाडी चालवत होता. तारा सिंह गाडीत नव्हते.

आमदाराच्या गाडीने पोलिस चौकीला धडक दिली तेव्हा हेड कॉन्स्टेबल उमेश ईशी डयुटीवर होते. अपघातात ते जखमी झाले आहेत. तर या गाडीचा चालक महेंद्र गुप्ता हादेखील जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

2 कुत्रे ठार, पोलिस चौकी जमिनदोस्त...  
या अपघातात रस्त्यावरील 2 कुत्रेही ठार झाले आहेत. तसेच पोलिस चौकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात नेमका कसा झाला, याचा पोलिस शोध घेत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. भाजप आमदाराच्या गाडीच्या अपघाताचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...