आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP MLC Opposes Harbhajan Singh Cricket Academy In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरभजन सिंग परप्रांतीय, त्‍याला मुंबई मनपाने जमीन देऊ नयेः भाजप आमदाराची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्‍या मुंबईतील प्रस्‍तावित क्रिकेट अकादमीला विरोध सुरु झाला आहे. भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी हरभजनच्‍या अकादमीला विरोध केला आहे. हरभजन मुंबईकर नसल्‍यामुळे त्‍याला महापालिकेची जमीन देण्‍यात येऊ नये, अशी भूमिका शेलार यांनी घेतली आहे.

हरभजन सिंगने अंधेरी येथील क्रिडा संकुलात क्रिकेट अकादमी सुरु करण्‍याचे प्रयत्‍न केले आहेत. त्‍यासाठी त्‍याने महापालिकेला जमीन मागितली आहे. परंतु, शेलार यांनी मनपा आयुक्त सीतारम कुंटे यांना एक पत्र लिहून सांगितले की, हरभजन हा परप्रांतीय आहे. त्‍याला मनपाची जमीन देऊ नये. मनपाने त्‍याला जमिन दिल्‍यास भाजप विरोध करेल. गरज भासल्‍यास आंदोलनही करण्‍यात येईल.

हरभजनने सोमवारी कुंटे यांची भेट घेऊन अकादमीचा प्रस्‍ताव दिला होता. त्‍यात त्‍याने मनपा शाळेतील मुलांनाही क्रिकेटचे प्रशिक्षण देण्‍याचे म्‍हटले होते. शेलार हे भाजपचे विधान परिषद सदस्‍य आहेत. तसेच ते मुंबईतील एका‍ क्रिकेट क्‍लबचे सदस्‍यही आहेत. त्‍यांनी विरोध केल्‍यानंतर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचेही समर्थन त्‍यांना मिळू शकते. हरभजनऐवजी मुंबईच्‍या एखाद्या खेळाडूला अकादमीसाठी जागा द्यावी, असे शेलार यांनी सांगितले आहे.