आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात गरिबांना न्याय मिळत नाही, सलमानच्या बेलनंतर सत्यपालांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिट अॅंड रन केसप्रकरणात सलमान खानला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने सलमानला बेल मंजूर केल्यानंतर भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यूपीतील बागपतचे खासदार असलेले सत्यपाल सिंह म्हणाले, ''दोन दिवसापूर्वीच मला शंका आली होती. या देशात गरिबांना न्याय मिळणार नाही. पैसे वाल्या व्यक्तींना शेवटी शिक्षा देणे कठीन असते. आपल्या देशात अशीच कायदा सुव्यवस्था करून ठेवली आहे. कोणत्याही कोर्टाचा निर्णय अंतिम मानला जात नसतो. आपल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला पाहिजे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की, 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा खालच्या कोर्टाने सुनावली असेल तर हायकोर्ट जामीन मंजूर करू शकते. आज काल एक नविन फॅशन आली आहे, न्यायालयांनाही कॅंपेन चालवून प्रभावित करण्याचा ट्रेंड येत आहे. निर्णय तुम्ही म्हणाल तसा लागलाच पाहिजे असे काही नाही. राजीव शुक्ला वृत्तवाहिन्यांबाबत अप्रत्यक्षरित्या बोलत होते.
उद्योगपती व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय जफर सुरेशवाला यांनी सलमान मुस्लिम असल्याने त्याला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टासाठी सर्व सारखेच व समान असतात. कोर्टाच्या नजरेत सेलिब्रिटीही आरोपीच असतो. सत्यपाल सिंह यांचे वक्तव्य व्यक्तिगत असल्याचे सुरेशवाला यांनी म्हटले आहे.
टि्वटरवर चर्चा फक्त #SalmanBailOrJail
सलमान खानला जामीन मिळणार की नाही याबाबत आज सकाळपासूनच सोशल मिडियात वाद रंगला होता. सलमानचे समर्थक बेल मिळणार असल्याचे सांगत होते व बेल मिळण्याचे कारणाचा तर्कही सांगत होते. दुसरीकडे, सलमान खानने हा गुन्हा कबूल केला असता व जेलमध्ये गोला असता तर त्याची प्रतिमा उंचावली असती व मोठा स्टार अभिनेता म्हणूनही प्रसिद्धी वाढली असती. सलमानला बेल मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे.
टि्वटवरील प्रतिक्रिया वाचा खाली...
@meghamamgain
He would have been a bigger hero in the fan's eyes if he had gone to jail #SalmanBailOrJail
‏@seemantinibose
So, what does Aamir Khan, the holiest man on earth, has to say now? No tears for common man now? #SalmanBailOrJail
@beastoftraal
Waiting for an avalanche of Bollywood stars' orgasms on Twitter now that Bhai's sentence is suspended and he is free till June 7.
@Babu_Bhaiyaa
ßadhai ho...bail hua hai...... #SalmanBailOrJail
@ouchh_potato
As a Doctor & a citizen of India, I jus wish our ambulances for d poor were as fast as the law is for d rich #SalmanBailOrJail
@BahadurManmohan
#SalmanBailOrJail B'wood shud make movie 'No one was driving the vehicle' like 'No one killed Jessica.' In this drone age, maybe it was so!
@Richa529
If today I hit someone while driving plz dnt arrest me, I am Just following the path of my SuperStar #SalmanBailOrJail
‏@DinuAkshi
How can a Person Escaped from Punishment After He Killed A Person ! its Ridiculous ! is Tiz d Law in Ind :( #SalmanBailOrJail @DinuAkshi
पुढे वाचा, नेटिझन्सच्या निवडक प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...