आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे आशिष शेलार यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी भाजपचे आशिष शेलार यांची अध्यक्षपदी निवड केली, तर वेंगसरकर यांच्या जागी विनोद देशपांडे यांना निवडले. शेलार यांच्या रिक्त उपाध्यक्षपदी पंकज ठाकूर यांची निवड करण्यात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांनी मिळून ही निवड केली.
 
वाजगे पाटील, तिगडी, गणेश अय्यर हे सदस्य गैरहजर होते.   या निवडीची वैधता मात्र अद्याप कळू शकली नाही. लोढा समितीच्या शिफारशींनुसार घटनेत बदल करून नंतर होणाऱ्या निवडणुकांपर्यंत ही व्यवस्था राहील, असा अंदाज आहे. 
बातम्या आणखी आहेत...