आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांच्या 150 एकर जमिनीवरून भाजपचे आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उस्मानाबाद येथे 150 एकर जमिन खरेदी केल्यावरून भाजपने आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांना त्याला प्रत्त्युत्तर दिेले आहे. मलिक यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी व माझ्या परिवाराने सर्व नियमांचे पालन करीत ही जमिन खरेदी केली आहे. भाजपने मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. त्यानुसारच भाजप माझ्या जमिनीबाबत उलट-सुलट माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, याप्रकरणी माझे कुटुंबिय कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे.
गुरुवारी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी सांगितले की, माझी पत्नी, दोन्ही मुले, दोन्ही व मुली व सूनेने मिळून उस्मानाबाद येथे 150 एकर जमिन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. यासाठी माझ्या कुटुंबियांनी स्टम्प ड्यूटी म्हणून 8 लाख 40 हजार रुपये भरले आहेत.
निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र सादर करतो त्यात याबाबत माहिती दिली आहे. सध्या आम्ही शेती करीत नाही. पण माझे कुटुंब शेतकरी परिवारातील आहे. त्यामुळेच ही शेती करण्यासाठी जमिन खरेदी केली आहे, असेही मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपने मलिक यांच्यावर शेतकरी नसताना 150 एकर शेती कशी खरेदी केली व पैसा कोठून आला असा आरोप केला होता.