आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पूर्ती\' संबंधीत नऊ ठिकाणी प्राप्तीकर खात्याचे छापे, गडकरी अडचणीत येण्याची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर खात्याने छापे टाकले आहेत. यामुळे नितीन गडकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचे विद्यामान अध्यक्ष असलेले गडकरी यांना बुधवारी अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आल्यामुळे गडकरी अडचणीत येऊ शकतात. पूर्ती कंपनीतील कथित गैरव्यवहारामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी पक्षातीलच विरोधकांनी जोर धरला होता. आता पून्हा एकदा पूर्तीशी संबंधीत ठिकाणांवर छापेमारी झाल्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुस-या टर्मला शह बसतो की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पूर्ती कंपनीशी संबंधीत ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या कंपनीमधील गुंतवणूकीसंदर्भात प्राप्तीकर खात्याकडून चौकशी करण्यात आली आहे. याआधीही मुबंई आणि नागपूरमध्ये प्राप्तीकर विभागाने पूर्ती कंपनीसंबंधीत माहिती घेतली होती. पूर्ती कंपनीशी संबंधीत अनेक अधिका-यांचे आणि संचालकांचे पत्ते मुंबईतील आहेत. हे पत्ते मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पूर्तीच्या व्यवहारांबाबत संशय निर्माण झाला आहे. प्राप्तीकर खात्याने मात्र हे छापे नसून माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जात असल्याचे सांगितले आहे.