आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेर्टाच्या आदेशानंतर नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयावर हातोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरिमन पॉइंट येथील एलआयसी ऑफिसच्या समोर असलेल्या नेहरू बागेच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेल्या भाजप कार्यालयाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाजपने नव्याने कार्यालय उभारल्यानंतर काही बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयात अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, असे भाजपने सांगितले होते. त्यानुसार कार्यालय पाडण्यात येत असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मुंबई मनपाने कार्यालयाच्या सुशोभीकरण व विस्तारीकरणाच्या कामास स्थगिती दिलेली असतानाही आदेश धाब्यावर बसवून कार्यालयाचे काम पूर्ण करून मैदानाची जागा गिळंकृत केल्याचा आरोप नरिमन पाइंट-चर्चगेट सिटिझन्स वेल्फेअर ट्रस्ट, ओव्हल कूपरेज रेसिडेंट असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ चर्चगेट रेसिडेंट यांनी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. भाजपला कार्यालयासाठी २६८६ चौरस फूट जागा देण्यात आली होती. मात्र, कार्यालय ९५०० चौरस फूट जागेवर उभे असल्याचे न्यायालयात दाखवून देण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...