आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Play Game In Legislature Council Elections, Give Ticket To Jankar, Mete

शेट्टींना दणका; मेटे, जानकरांची लॉटरी, विधान परिषद निवडणुकीत भाजपची खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रासपचे महादेव जानकर या मित्रपक्षांच्या नेत्यांना विधान परिषदेवर आपल्या कोट्यातून संधी देत भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलाच दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारविरोधात ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाचा फटका ‘स्वाभिमानी’ला बसला असून जानकर आणि मेटेंच्या सोबतीने विधानमंडळात जाण्याची सदाभाऊ खोत यांची संधी मात्र हुकली.

विनोद तावडे, पृथ्वीराज चव्हाण आणि आशिष शेलार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या ३ जागा व पक्षांतर बंदी कायद्यामुळे बाद झालेल्या विनायक मेटेंची रिक्त झालेली १ जागा अशा ४ जागांसाठी होणा-या निवडणुकांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चारच अर्ज दाखल झाले. भाजपच्या कोट्यातून शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेत्या स्मिता वाघ या तिघांनी तर शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई यांनी अर्ज दाखल केले.

दोन मित्रपक्षांना खुश करतानाच भाजपने स्वाभिमानी आणि रिपाइं या दोन मित्रपक्षांना मात्र नाराज केले. विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळेल अशी आशा असलेल्या स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.

बिनविरोध निकालाची औपचारिकताच बाकी
येत्या ३० जानेवारी रोजी होणा-या विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपच्या वतीने तीन आणि शिवसेनेच्या वतीने एक असे चारच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता अर्ज छाननीनंतर निवडणूक निकालांच्या घोषणेची निव्वळ औपचारिकता बाकी आहे.

एनसींसाठी लॉबिंग, भंडारींचा पत्ता कट
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी या दोघांच्या उमेदवारीची शक्यता होती. ऐनवेळी जानकरांना संधी दिल्याने भंडारींचे नाव मागे पडले. एन.सी.यांच्यासाठी दिल्लीतून लॉबिंग झाले. 'विधान परिषदेसाठी वर्णी लागल्याने धन्यवाद 'असे एसएमएसही त्यांच्या वतीने पत्रकारांना येत होते. शेवटच्या क्षणी खडसे समर्थक स्मिता वाघ यांची वर्णी लागल्याने आश्चर्यही व्यक्त झाले.

मुख्यमंत्र्यांनी केले दोन प्रतिस्पर्धी खुश
तीन वेळा जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या स्मिता वाघ यांची विधान परिषदेसाठी वर्णी लावत मुख्यमंत्र्यांनी खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेली चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी लागू करत मुनगंटीवार यांनाही खुश केले. एकाच दिवशी दोन प्रतिस्पर्ध्यांना खुश करण्याची किमया त्यांनी साधली.

पुढे वाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजीचे सूर...