मुंबई- भाजपचे पक्षाध्यक्ष
अमित शहा यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्रीच कॅण्डी रूग्णालयात भेट घेतली. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या तीन बड्या नेत्यांच्या चौकशीला एसीबीला परवानगी दिल्यानंतर अमित शहांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे. शहांनी पवारांची सुमारे 20 मिनिटे भेट घेतली. भेटीचा तपशील कळू शकला नाही.
शरद पवार मागील आठवड्यापासून दिल्लीतील घरी घसरून पडले आहेत. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते रूग्णालयातच असून, विश्रांती घेत आहेत. येत्या दोन-चार दिवसात पवारांना रूग्णालयात घरी सोडण्यात येणार आहे.