आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पाहा अमित शहांच्या मुंबई दौ-यातील क्षणचित्रे....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षात फक्त घोटाळे करून महाराष्ट्राला लुटले आहे. 11 लाख 28 हजार कोटी रूपये विद्यमान आघाडी सरकारने पचवले असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत केली.

षण्मुखानंद सभागृहात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला अमित शहा यांनी संबोधित केले. शहा म्हणाले, की महाराष्ट्र ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे. परंतु आघाडी सरकाने महाराष्ट्राचे नाव खराब केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करत अमित शहा यांनी 'छत्रपतींचा आर्शीवाद, चलो चले मोदी के साथ' असा नाराही दिला. अमित शहा यांनी मुंबईतील लालबागच्या राजाला नमन करून त्यांचा आशिर्वादही घेतला.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होईल तेव्हा होईल, याचा विचार कार्यकर्त्यांनी करू नये, असे सांग‍त अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सूर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्य़े प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर यांनीही अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी चारच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली.
बड्या नेत्यांचा अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश- राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सुर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते, माधव किन्हाळकर, माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दत्ताभाऊ प्राथीवकर, अजयसिंग बिसेन यांनीही भाजपात प्रवेश केला.
पुढील स्लाईडवर बघा अमित शहा यांच्या दौऱ्याची छायाचित्रे...