आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp President Amit Shah Phone Calling Uddhav Thackeray Early Morning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षांसोबत युती शक्य नाही- राजीवप्रताप रूडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप-सेनेची महायुती कायम राहील अशी मला आशा आहे. भाजपने दिलेल्या जागांच्या प्रस्तावावर पुर्नविचार करावा. सेनेसोबत युती झाली नाही तरी इतर कोणत्याही पक्षाला सोबत घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी दिली आहे. तर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असा फॉर्म्यूला ठरला आहे. जागांच्या तिढ्याबाबत शिवसेनेची चर्चा करण्याची मानसिकता दिसत नाही अशी टीका केली आहे.
महायुतीतील जागावाटप हा चर्चेचा व वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र, महायुती अबाधित राहावी अशीच माझ्यासह पक्षाची भूमिका आहे, असे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र असतानाही शहा यांनी उद्धव यांना फोन केल्याचे कळते आहे. दरम्यान, अशी कोणतेही बातचीत झाली नसल्याचे सांगत शिवसेनेने या वृत्ताचे खंडन केले आहे. शिवसेना आपल्या 'मिशन 150'वर ठाम असल्याचे कळते. दुसरीकडे, भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर आज सायंकाळी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटणार आहेत. यावेळी भाजपच्या वतीने ही अंतिम चर्चा असेल असे सांगितले जात आहे.
आज सकाळी अमित शहा आणि उद्धव यांच्यात सुमारे 15 मिनिटे जागावाटप व महायुतीबाबत चर्चा झाली. उद्धव यांनी मात्र आपल्या पक्षाने 'मिशन 150' ध्येय ठेवले असल्याने यापेक्षा मी अधिक काहीही करू शकत नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यातून स्पष्ट होत आहे की, भाजपने दोन पावले मागे येत महायुती टिकवावी अथवा स्वबळावर लढण्याची तयारी करावी असेच उद्धव यांनी अप्रत्यक्ष सुचवले आहे.
घटकपक्ष सैरभैर- भाजप व शिवसेनेच्या वादात घटकपक्षांचे मरण झाले आहे. या पक्षांना कोणीही विचारत नाही की त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे एक-दोन दिवसात तिढा सोडवा अन्यथा आम्हाला तिसरी आघाडी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे. तरीही महायुती अबाधित ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू असे या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.
आठवलेंची भूमिका भाजपला पूरक- महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेला रामदास आठवलेंचा आरपीआयने घेतलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ज्या बाळासाहेबांनी व शिवसेनेने आठवलेंना आणले ते आठवले आता भाजपला जास्त जागा वाढवून द्यावेत असे सांगत आहेत. आम्हा घटकपक्षांना 20-22 जागा द्यावात. भाजपला 125 जागा द्याव्यात व शिवसेनेने 144 जागा लढवाव्यात असा आरपीआयने म्हटले आहे.
मात्र, उद्धव ठाकरेंनी आठवलेंचा फॉर्म्यूल्याकडे लक्षही दिले नाही. उद्धव ठाकरेंचा मुलगा व युवा सेनेचा प्रमुख आदित्य ठाकरे व त्यांच्या सहका-यांनी शिवसेनेसाठी 'मिशन 150'हे उदिष्ट ठेवत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे उद्धव आदित्यचे स्वप्न करण्यासाठी 150 पेक्षा एकही कमी जागा घेणार नसल्याचे कळते. दरम्यान, भाजपला पूरक भूमिका घेतल्याने आरपीआय व आठवलेंनी उद्धव व सेनेची नाराजी ओढावून घेतली आहे.