शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी पठडीतले आक्रामक राजकारण करुन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
अमित शहा यांना मात देण्याचा प्रयत्न केला होता. जागा वाटपावर चर्चा सुरू असताना जराही माघार घेतली नव्हती.
आपली बाजू लावून धरली होती. यावेळी युतीचा दोर कधी तुटेल असे त्यांना वाटले नव्हते. पण अखेर भाजपने संधी साधत आक्रामक राजकारणावर आक्रामक राजकारणाने मात केली. गेल्या 25 वर्षांपासून अस्तित्वात असलेली युती एका क्षणात तोडली. त्यानंतर शिवसेनेचा संताप समजण्यासारखा होता. पण शिवसेनेचे एकमेव केंद्रीय नेते अनंत गिते राजीनामा देणार नाहीत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी भारतात आल्यावर चर्चा करुन हा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. यावरुन अमित शहा यांचे आक्रामक राजकारण सरस ठरल्याचे दिसून येते. निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या या यशाने शहा यांच्यातील इलेक्शन मॅनेजमेंट पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अमित शहा आक्रामक राजकारण आणि इलेक्शन मॅनेजमेंटसाठी ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहा यांची उत्तर प्रदेशात वर्णी लागली तेव्हा काही राजकीय विश्लेषकांनी ही नरेंद्र मोदींची घोडचुक असल्याचे सांगितले होते. कारण शहा यांना उत्तर प्रदेशच्या प्रादेशिक राजकारणाची जराही माहिती नव्हती. शिवाय कधी त्यांनी उत्तर प्रदेशात कामही केले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण अमित शहा यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखवले. एकूण 80 जागांपैकी तब्बल 71 जागा जिंकून दाखवल्या. नरेंद्र मोदी यांचा दिल्लीचा मार्ग सुकर करुन दाखवला.
याच अमित शहा यांच्यावर आता महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शहा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रीय झाले आहेत. त्यांच्या आग्रहानंतरच नरेंद्र मोदी राज्यात 15 प्रचार सभा घेण्यास राजी झाले आहेत. शहा यांची सासूरवाडी कोल्हापुरची असल्याने महाराष्ट्रातील राजकारणाची जाणीव त्यांना आधीपासून आहे. त्यात आता निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर आल्याने त्यांच्यातील राजकीय कौशल्याचे दर्शन होणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, शिवसेनेचा वाघ नरमला कसा.... उद्धव यांनी माघार घेतली कशी... बाळासाहेबांमधून पक्षात उतरलेला ठाकरी बाणा अचानक गेला कुठे...