आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: ‘मध्यावधी’साठी भाजपचे डावपेच; राणेंसाठी पुन्हा पत्ते खुले, शहांच्या दौऱ्याकडे नजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुमताचा अाकडा कमी पडत असेल तर शिवसेनेसह विरोधकांचे आमदार फोडण्याचीही भाजपची रणनीती असेल. - Divya Marathi
बहुमताचा अाकडा कमी पडत असेल तर शिवसेनेसह विरोधकांचे आमदार फोडण्याचीही भाजपची रणनीती असेल.
मुंबई - शेतकऱ्यांचा संप अाणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली संपाची हाक या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती अस्थिर होत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या आठवड्याच्या अखेरीस मुंबईत तीन दिवस मुक्काम ठोकणार आहेत. भाजपच्या पक्ष विस्ताराविषयी हा दाैरा असल्याचे सांगण्यात येत असले तरी मध्यावधी निवडणुकीबाबत चाचपणी करण्यासाठीच शहा येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दाैऱ्यात शहा काय अादेश देतात, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले अाहे.
 
सुमारे शंभर दिवसांपासून देशव्यापी दाैऱ्यावर असलेले अमित शहा १६ ते १८ जूनदरम्यान मुंबईत येत अाहेत. या वेळी ते राज्य सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. तसेच केंद्राच्या योजना लोकांपर्यंत किती पोहोचवण्यात आल्या, याविषयीही माहिती घेतील. मात्र, मुख्य फोकस असेल तो मध्यावधी निवडणुकीवर.

कर्जमाफी देण्याची घोषणा झाली असली तरी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे कठीण आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी तिजोरीतील खडखडाट. कर्जमाफी दिल्यास पायाभूत सुविधांच्या कामांना कात्री लावावी लागेल अाणि त्याचा मोठा परिणाम पुढील अडीच वर्षांत होईल, अशी भीती भाजपमधून व्यक्त होत आहे. हे लक्षात घेऊन फडणवीस सरकारला ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होत असताना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ घेऊन मध्यावधीला सामोरे जाण्याचा एक पर्याय सरकारसमाेर आहे. डिसेंबरमध्ये गुजरातची निवडणूक होत असून त्याचबरोबर महाराष्ट्रानेही मध्यावधीला सामोरे जावे का, यावर शहांसाेबतच्या बैठकीत प्रमुख चर्चा होईल.
 
मुख्यमंत्र्यांकडूनही निवडणुकांचे संकेत
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका मेळाव्यात भाजपकडूून मध्यावधीची तयारी केली जात असल्याचा गाैप्यस्फाेट करण्यात अाल्यानंतर भाजप नेतेही अाता अापला पक्ष मध्यावधीला तयार असल्याचे जाहीरपणे सांगू लागले अाहेत. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रसार माध्यमांशी बाेलताना याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली हाेती.
 
पुढील स्लाइडवर... राणेंसाठी पुन्हा पत्ते खुले
बातम्या आणखी आहेत...