आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp President Rajnath Singh Slap To Raj Thackeray

\'मत विभाजनाचा धोका कायम असल्याने मनसे भाजपलाही नकोशी, शिवसेनेत आनंद\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय जनता पक्ष पुरस्कृत एनडीएत देशातील छोटे-मोटे 25 पक्ष सहभागी झाले आहेत. तरीही अनेक पक्ष न मागता नरेंद्र मोदींना पाठिंबा व समर्थन देत आहे. जर कोणाला समर्थन द्यायचे असेल तर महायुतीत सामील व्हा आणि नाही तर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकून राजकारण करू नका. राजकारण सत्यतेवरच चालते, अशा शब्दात भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी राज ठाकरेंना नाव न घेता चपराक दिली. दरम्यान, मतविभाजन होण्याचा धोका कायम असल्यानेच व भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेत मनसेच्या उमेदवाराचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होत असल्याचे पुढे येताच आता भाजपलाही मनसे व राज ठाकरे नकोसे झाले आहेत. दरम्यान, या घडामोडीमुळे शिवसेनेत उत्साह संचारला आहे. तर, मनसेच्या नेत्यांचे चेहरे काळवडंले आहेत. आता भाजपनेच विशेषत खुद्द राजनाथ सिंह यांनीच आम्हाला पाठिंबा नको असे सांगितल्याने यापुढे मोदींचे नाव वापरावे की नाही असा विचार करीत आहेत. तसेच याबाबत मनसेचे उमेदवार राज ठाकरेंकडेही याबाबत विचारणा करणार असल्याचे कळते. मात्र, राज ठाकरेंनी मोदीमंत्र सुरुच ठेवल्याने स्थानिक उमेदवार नैतिक पातळीवर अडचणीत आले आहेत.
राजनाथ सिंह पुण्याचे भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारासाटी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, शिवसेनेसोबत आमची देशपातळीवर 18 वर्षापासून युती आहे. त्याआधी राज्यातही आम्ही विचारधारेवर एकत्र आलो होतो. त्यामुळे शिवसेना हा आमचा सर्वात जवळचा, विश्वासार्ह व जुना मित्रपक्ष आहे. भविष्यात शिवसेनेसोबत युती कायम राहील. देशातील लोकांना नरेंद्र मोदींचे सरकार आहे. त्यामुळे एनडीए दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. भाजपने देशातील 25 छोट्या-मोट्या पक्षासोबत युती केली आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष न मागता नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देत आहेत. हे समर्थन कशासाठी देता. मोदींना पाठिंबाच द्यायचा असेल तर एनडीएत सामील व्हा अन्यथा भाजपमध्ये विलीन व्हा, असे सांगत मनसेचा मोदींना पाठिंबा नकोच आहे असे स्पष्ट संकेत दिले.
मनसेने सेनेचे उमेदवार पाडण्यासाठी ठराविक ठिकाणीच उमेदवार केल्याची चर्चा सुरु आहे. त्याचा थेट फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीला होणार आहे. त्याचा धागा पकडत राजनाथ म्हणाले, राजकारणात आता जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. सत्य, निष्ठेवरच व खरे बोलूनच राजकारण केले पाहिजे असे सांगत मोदींना पाठिंबा देता आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करता असा मुद्दा उपस्थित केला.
पुढे वाचा, बसपा, आप वारी करून डीएसके अखेर भाजपमध्ये...