आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Rajyasabha Seats, Discussion Is Going On Athavale & Javadekar\'s Name

महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून रामदास आठवलेच? जावडेकर छत्तीसगडमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या पक्षाच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर की रामदास आठवले यावरून चर्चेचे गु-हाळ रंगले असून, कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज मुंबईत भाजप नेत्यांच्या बैठकीत रामदास आठवले यांना महाराष्ट्रातूनच पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा सायंकाळपर्यंत करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रकाश जावडेकर यांना छत्तीसगडमधून राज्यसभेत पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
प्रदेश भाजपची आज दुपारी मुंबईत बैठक झाली. यात रामदास आठवले, उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपचे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे उपस्थित होते. या बैठकीत रामदास आठवलेंना महाराष्ट्रातून पाठवणे कसे फायद्याचे आहे यावर चर्चा झाली तर, जावडेकर राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना इतर राज्यातून पाठविले तरी काही हरकत नाही व वेगळा संदेशही जात नाही अशी बैठकीत चर्चा झाली.
शुक्रवारी दिल्लीत या दोघांच्या नावावरून तब्बल तीन तास काथ्याकूट करूनही निर्णय घेता आला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित मते महत्त्वाची असून, रामदास आठवले यांना महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवावे असे मत मुंडे गटाने व्यक्त केल्याचे कळते. तसेच जावडेकरही पक्षाचे महत्त्वाचे नेते असून, त्यांना छत्तीसगडमधून राज्यसभेत पाठवावे असे सांगितल्याचे कळते.
भाजपच्या कोट्यातील एकमेव जागेवरून महाराष्ट्रातून रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवावे, असे मत राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंडेंनाही वाटत आहे. त्यामागे आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे गणित आहे. आरपीआय युतीत सामील झाला असून, राज्यात लोकसभेच्या जास्त जागा जिंकण्यासाठी व नंतर विधानसभा निवडणूकीतही परिवर्तन करण्यासाठी भाजप-सेनेला दलित मतांची गरज आहे. राज्यात गेली 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. त्यामुळे जनतेच्या मनात या सरकारविरोधात रोष आहे. या रोषाला धार आणण्यासाठी दलित मते सरकारच्या विरोधात जाणे गरजेचे आहे.
पुढे वाचा, जावडेकर-आठवलेऐवजी टीम मोदीला हवी आहे शायना एनसी...