आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यावधीसाठी सरकारकडे पैसा आहे का, कर्जमुक्तीला फाटा देण्यासाठी निवडणुकीचा घाट - उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/शेगांव - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्या नात्यात पुन्हा एकदा कटूता  आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मध्यावधीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी मध्यावधी निवडणुकीसाठी पैसे आहेत का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही तर भूकंप होईल.
 
सरकार कर्जमुक्तीला फाटा तर देणार नाही...
- उद्धव ठाकरे आज शेतकरी विजयी मेळाव्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथे आले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बळ आणि सदबुद्धी दे, अशी मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
- एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री मध्यावधीला तयार असल्याचे सांगून कर्जमुक्तीला फाटा देण्याचा तर विचार करत नाहीत ना, अशी शंका येत आहे. 
- उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यावधीसाठी तुमच्याकडे जो पैसा आहे, तो पैसा शेतकऱ्यांना द्या. त्याचा सातबारा कोरा करा. आमचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील. 
- त्यासोबतच उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारला कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही. त्यासाठीच ते मध्यावधीची चर्चा करुन कर्जमुक्तीला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहे.
 
कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी निवडणुकीसाठी पैसे आहेत का
- शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, जर मुख्यमंत्रीच बोलत असतील तर शिवसेनेला आपली भूमिका मांडावी लागेल. मात्र, शेतकरी कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी निवडणुकीसाठी पैसे आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
- मुख्यमंत्र्यांनी भाजप 'मध्यावधी'ला तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर गुरुवारी शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री जे बोलत असतील ती सरकारची भूमिका असेल तर  युती कधीही तुटू शकते अशी परिस्थिती आहे. 
- राऊत यांनी, मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट ही सरकारची भूमिका असण्याची शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले,  मला असं वाटतं की ती मुख्यमंत्र्यांची भूमिका नाहीये. मुख्यमंत्री कार्यालयातून जर कोणी बोललं असेल तर ती भूमिका सरकारची की मुख्यमंत्र्यांची हे कोण सांगेल...? 
- त्यासोबतच राऊत म्हणाले, प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच बोलत असतील तर त्याच्यावर शिवसेनेची भूमिका आम्हाला मांडावी लागेल. 
- आज महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लढत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. अशा वेळेला सरकारकडे मध्यावधी निवडणुकीसाठी पैसे आहेत का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. 
 
अमित शहा मातोश्रीवर येणार... 
- भाजपाध्यक्ष अमित शहा 16 ते 18 जून दरम्यान मुंबई दौऱ्यावर आहेत. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची चर्चा आहे. 
- अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार का, या संदर्भात divyamarathi.com ने राऊत यांना विचारले असता त्यांनी होकार दर्शवला. 
- संजय राऊत म्हणाले, यामध्ये राजकारण वगैरे काही नाही. दोन पक्ष प्रमुख एकमेकांना भेटणार आहेत. याआधी एनडीएच्या बैठकीवेळी दिल्लीत पण त्यांची भेट झाली होती. 
- भाजपाध्यक्ष रविवारी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 
- राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिवसेनेचा अजेंडा विचारला असता तो, दोन्ही पक्षांचे प्रमुखच सांगतील असे राऊत म्हणाले. 
 
हेही वाचा..