आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Campaigns For Narayan Rane In Bypoll

मुंबई मनपा निवडणूक येताच सरकार कोसळणार, शरद पवारांची ‘भविष्यवाणी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : वांद्रे पूर्व मतदारसंघातील प्रचारसभेच्या व्यासपीठावर एकत्र आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कॉंग्रेसचे उमेदवार नारायण राणे.)
मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजप शिवसेनेचे युती सरकार पडणार हे निश्चित आहे. कारण शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत जास्त जागा हव्या आहेत. कारण त्यांना मागील २२ वर्षांप्रमाणेच यापुढेही या महापालिकेची सत्ता उपभोगायची आहे. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत भाजपला जास्त जागा सोडणार नाही आणि याच कारणावरून हे दोन्ही पक्ष वेगळे होतील सत्ता कोसळेल, अशी भविष्यवाणी माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.

वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘मुंबई महापालिकेच्या सत्तेशिवाय शिवसेना राहू शकत नाही. ही सत्ता मिळवण्यासाठी त्यांना भाजप सोबत हवाच आहे, पण तो वरचढही व्हायला नकोय. सत्तेचे प्रमुख वाटेकरी म्हणून शिवसेनेलाच राहायचेय आणि हीच गोष्ट भाजपच्या पसंतीस उतरणारी नाही. नेहमीप्रमाणे शिवसेना भाजपला कमी जागा देणार. आणि हा निर्णय मान्य नसल्याने भाजप त्यांच्या सोबतीला राहणार नाही आणि युतीचे सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात दोन वर्षांत निवडणुका होतील, हे निश्चित,’ असे विश्लेषणही पवारांनी केले.

बाळासाहेबांची शान वारसांनी घालवली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मर्दांची होती; पण त्यांच्या वारसांनी शान घालवली. या वारसांनी आज शिवसेना कुठे नेऊन ठेवली आहे, हे आपण सर्व जण आपण पाहत आहोतच. अशी शिवसेना बघण्याची मराठी माणसांना सवय नव्हती. बाळासाहेबांनी समाजातील सर्व घटकांचा विचार केला होता. मनोहरपंतांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करून त्यांनी राणेंना मुख्यमंत्री केले. हल्लीच्या ठाकरेंच्या पिढीला मात्र राणेंची किंमत कळली नाही, असा जोरदार टोला पवारांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेता लगावला.

पुढे वाचा, एमआयएम युतीचे पिल्लू...