आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर ‘शिवसेना अस्त्र’! याकूबच्या माफी पत्रावरून विधानसभेत घेरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९३ च्या बॉम्ब खटल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला स्थगिती द्यावी म्हणून काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपने बुधवारी विधानसभेत काँग्रेसला घेरले. राष्ट्रवादीनेही बघ्याची भूमिका घेत काँग्रेसला एकटे पाडले अाणि भाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी करून अालेली काँग्रेस चांगलीच ताेंडघशी पडली. विराेधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांवर शिवसेनेच्या आमदारांना सोडण्याची याेजलेली ही रणनीती यशस्वी ठरली.

बुधवारी विधानसभेत कामकाज सुरू हाेताच शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांनी लिहिलेल्या पत्राचा मुद्दा उचलला आणि सर्व सत्ताधारी अामदार गुलाबरावांच्या मागे उभे राहिले. नेहमी विरोधक अध्यक्षांच्या समोरील जागेत गाेंधळ करतात, परंतु बुधवारी सत्ताधारी आमदार हे काम करताना दिसले. प्रताप सरनाईकसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी हातात फलक घेऊन अभिनेता सलमान खानसह काँग्रेसच्या मुस्लिम
आमदारांविराेधात घाेषणाबाजी केली. पत्र लिहिणा-या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात अाल्याने काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला.

नसीम खान यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काँग्रेसच्या अन्य आमदारांनीच मदत केली नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मराठवाड्याच्या चर्चेचाच मुद्दा सतत उचलत होते. राष्ट्रवादीनेही गप्प राहून एक प्रकारे शिवसेना आणि भाजपलाच मदत केली. एमआयएमचे आमदारही गप्प राहिले. या गाेंधळात सभागृह दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. त्यामुळे सरकारला अडचणीत अाणण्याचा विराेधकांचा डाव फसला.

पुढे वाचा, अशी ठरली रणनीती