आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP, Shiv Sena, NCP Keeps Their Side On Maharashtra Flower Test

ANALYSIS: विश्वासदर्शक प्रस्तावात अशी झाली जनतेच्या डोळ्यांत धुळफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विधानसभेत घेण्यात आलेला विश्वासदर्शक प्रस्ताव जनतेच्या डोळ्यांत निव्वळ धुळफेक असल्याचे दिसून येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षांनी सोईस्कर भूमिका घेऊन आपापली लाभाची बाजू राखली आणि फायदा करुन घेतला. भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली, शिवसेनेने विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडून संभाव्य फुट टाळली तर राष्ट्रवादीने तटस्थ राहात धर्मनिरपेक्ष प्रतिमा शाबूत ठेवली. अशा प्रकारे शिवसेनेतील संभाव्य फुट किंवा राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका यावरील पडदा कधीही उठणार नाही. याचाच दुसरा अर्थ असा, की तिनही पक्षांनी सोईस्कर भूमिका घेत जनतेची फसवणूक केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेकडे आज केवळ देशाचेच नव्हे तर जगाचे डोळे लागले होते. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार हे जवळपास निश्चित असे वाटत असले तरी ते कोणाच्या पाठिंब्याने किंवा अप्रत्यक्ष समर्थनाने येणार हे बघण्यासारखे होते. पण विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट मतदान न घेता आवाजी मतदान घेतले. त्यावर काही पक्षांनी आक्षेप घेतला. पण बागडे यांनी आपला निर्णय बदलला नाही. त्यानंतर आवाजी मतदानाने भाजप सरकारने बहुमत सिद्ध केले. मुळात अशा मतदानाने प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात किती मते पडली, याची नेमकी संख्या स्पष्ट होत नाही. याचाच दुसरा अर्थ असा, की लोकशाही पद्धत बाजूला ठेऊन सरकार टिकवता येऊ शकते.
मतदानानंतर शिवसेनेने मतविभाजनाची मागणी केली होती. आवाजी मतदानात कोणत्या पक्षाला किती मते मिळाली, हे त्यानंतर थोडेबहुत स्पष्ट झाले असते. विरोधी पक्षाने अशी मागणी केली असेल तर ती विधानसभा अध्यक्षांना मान्य करावीच लागते. अन्यथा सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पण विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी तरीही मान्य केली नाही. कदाचित शिवसेनेने ही मागणी करावी आणि विधानसभा अध्यक्षांनी ती मान्य करु नये, असे आधिच ठरले असावे.
विधानसभेतील नाट्यमय घडामोडींमुळे खरंच विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर झाला, की सगळेच काही आधी ठरले होते अशी शंका उपस्थित केली जात आहे. सर्वच पक्षांची भूमिका एवढी अविश्वसनिय आहे, की लोकशाही पद्धतीवरुन सर्वसामान्यांचा विश्वास उडेल. यामुळे राजकीय पक्षांमध्ये असलेले सेटिंग ठळकपणे लोकांसमोर येईल, असे दिसून येते.
पुढील स्लाईडवर वाचा, या तिनही पक्षांनी सोईस्कर भूमिका घेऊन कसा बघितला स्वतःचा फायदा.... कॉंग्रेसने कसा घेतला आवाजी मतदानाचा लाभ... सेना, राष्ट्रवादीने कमकुवत बाजूंवर कसा टाकला पडदा...