आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारमधून अनंत गिते बाहेर पडणार; भाजपला धडा शिकवू- शिवसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 25 वर्षापासून असलेली शिवसेना-भाजप युतीचा अखेर आज घटस्फोट झाला. याचे पडसाद राज्यात मोठे पडणार आहेत. दुसरीकडे, शिवसेनेने तातडीने आपल्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेनाही आपली भूमिका मांडणार आहे. याचबरोबर दिल्लीहून शिवसेनेचे मंत्री अनंत गिते मुंबईकडे रवाना झाले आहेत. याबाबत बोलले जात आहे की, गिते मोदी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. युतीचा संसार मोडल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात चौरंगी आणि मनसेंच्या ताकदीच्या ठिकाणावर पंचरंगी लढती होणार आहेत.
युती तुटण्यापूर्वी काय-काय घडले दिवसभरात... वाचा...
- शिवसेना- भाजपची युती तोडण्याची भाजपला घाई झाली असेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने भाजपला धडा शिकवेल- शिवसेनेचे नेते दिवाकर रावते
- भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी दिल्लीत युती तुटल्याची माहिती माध्यमांना कशी काय दिली- रावते
- स्थानिक भाजप नेत्यांशी आम्ही चर्चा करीत असून, युती टिकावी म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत- रावते
- शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षाला व चार घटकपक्षांना सामावून घेण्यासारखा प्रस्तावच मिळाला नाही- देवेंद्र फडणवीस
- भाजप नेत्यांना आम्ही भेटायला आल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांना न भेटता निघून गेले. भाजपच्या नेत्यांचे हे वागणे बरोबर नाही, ते खेदजनक आहे. भाजपला एकतर्फी युती तोडायची घाई झाली आहे- रावते
- उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक भारतीय जनता पक्षाला धडा शिकवतील- रावते
- भाजपकडून शिवसेनेला सन्मान दिला जात नाही. भाजप नेत्यांना आम्ही भेटण्यासाठी अडीच तास वेळ दिला. मात्र ते केवळ निरोप देऊन गेले.
- जागावाटपानंतर जागांच्या अदलाबदलीबाबत केवळ एका जागेवर भाजप आठमुडी भूमिका घेत आहे.
- आम्हाला केंद्रीय नेतृत्त्वाकडून युती तोडण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. ज्या बातम्या येत आहेत त्या सर्व आफवा आहे त्याकडे दुर्लक्ष करावे. शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे व जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल- राजीवप्रताप रूडी
भाजपने आधीच रचला होता डाव...
शिवसेना-भाजपची युती अभेद्य आहे असे भलेही दोन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी घटकपक्षांच्या जागावाटपाबरोबरच जागांच्या अदलाबदलीवरून भाजप-सेनेत कमालीची गुंतागुंत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. बुधवारी रात्री 3 पर्यंत भाजप-सेना नेत्यांत काथ्याकुट केल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे युती तुटल्यात जमा असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते खासगीत सांगत आहेत. दरम्यान, भाजप व सेनेने महायुतीतील घटकपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. भाजपने राजू शेट्टी, महादेव जानकर व विनायक मेटे यांना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर, रामदास आठवले उद्धव ठाकरेंबरोबर राहतील असे दिसत आहे.
शिवसेना व भाजप नेते महायुतीबाबत कोणतेही प्रतिक्रिया देण्यास टाळत आहेत. शिवसेना 150 च्या खाली येण्यास कोणत्याही स्थितीत तयार नाही. शिवसेनेने 145 जागा लढवाव्यात व आम्ही 125 जागा लढवाव्यात असे भाजपला वाटत आहे. तसेच उर्वरित 18 जागा घटकपक्षांना द्यावेत असे ओम माथूर यांचा सूर आहे. मात्र, शिवसेनेने 150 च्या खाली येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. काल रात्री माथूर यांच्या घरी रात्री तीनपर्यंत महायुतीच्या नेत्यांची खलबते सुरु होती. यात सेनेसह घटकपक्षांचे नेतेही उपस्थित होते. मात्र, कोणताही तोडगा दृष्टीपटात दिसत नव्हता.

जागावाटपाचा वाद सुटत नसतानाच भाजपने शिवसेनेच्या अनेक जागांवर दावा केला आहे. तो शिवसेनेने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. आमच्या जागा कोणत्या निकषावर सोडायच्या ते सांगा मगच जागा देऊ असे सेनेने भाजपला जाब विचारला. तुम्ही इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आमच्या जागा मागत आहात. युती असताना कोणत्या नेत्यांना पक्षात घेऊ याबाबत चकार शब्दाने आम्हाला सांगितले नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पारंपारिक जागावर उमेदवारांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जागा सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सेनेने भाजपला सुनावले आहे. त्यामुळे भाजपची तंतरली आहे. एकूनच घडामोडी पाहता भाजप-सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजप-सेनेत कोणताही तोडगा निघत नसल्याने घटकपक्षांतील जानकर आणि शेट्टी यांनी आपल्या उमेदवारांना फॉर्म भरण्यास सांगितले आहे. जानकर यांचा पक्ष 15 जागांवर तर शेट्टींचा 10 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म संबंधित उमेदवारांना दिले आहेत.
पुढे वाचा,
उद्धव ठाकरे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात...
अमित शहांचा मुंबई दौरा रद्द हे भाजप-सेनेच्या काडीमोडीचे संकेतच...