आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी काळी सेना-भाजपात कसा होता दोस्ताना, पाहा निवडक छायाचित्रातून...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बाळासाहेबांशी हस्तांदोलन करतानाच हात जोडलेले नरेंद्र मोदी)
मुंबई- विधानसभेची निवडणूक केवळ 22 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच शिवसेना-भाजपतील तणाव रविवारी युती तुटण्याच्या शक्यतेपर्यंत ताणला गेला. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीतही सारेकाही आलबेल आहे असे चित्र नाही. तेथेही स्वताच्या ताकदीची व स्वबळाची भाषा सुरु आहे. दोन्ही पक्षांची युती, आघाडी विचारांवर आधारित आहे.
भाजप-सेनेची युती गेल्या 25 वर्षापासून आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ताधारी आघाडी मागील 15 वर्षापासून आहे. पण आता या चारही पक्षांना आपापली ताकद वाढल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे. याचे कारण राज्यात लहान पक्षाच्या भूमिकेत असणा-या भाजप आणि राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीत जास्त खासदार निवडून आले आहेत. आता नाही तर कधीच नाही अशी भाजप व राष्ट्रवादीला वाटत आहे तर, शिवसेना व काँग्रेस हे आपापल्या जागेवरून हलायला तयार नाहीत. थोड्याफार जागा वाढून देण्याबरोबरच अदलाबदली करू असे दोन्ही मोठ्या पक्षांचे म्हणणे आहे.
मात्र, या छोट्या भावाला (राष्ट्रवादीला) आता जागा वाढवून दिल्या तर तो आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाहीत याची जाणीव काँग्रेसला आहे तर, मराठी अभिमान गहान ठेवणार नाही. मोडेन पण वाकणार नाही असा ठाकरी स्वाभिमानाला जागत शिवसेना 150 च्या खाली एकही जागा घेणार नाही असे सेनेने ठणकावून सांगितले. यापुढे खेचाखेची करू नका. तसे करायला गेल्यास माझा नाईलाज असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.
शिवसेना व भाजप ही युती खरे तर सत्तेसाठी नाही तर हिंदुत्त्वाच्या मुद्यांवर झाली आहे. तसेच शिवसेनेने भाजपला या मुद्यांवर देशपातळीवर कायमच साथ दिली आहे. सत्ता नसतानाही सेनेने आपल्या भूमिकेत कधीही बदल केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या त्रित्रुकाटमुळे युती जन्माला आली. मात्र, राजकीय पटलावरील हे देशव्यापी मोहरे आज हयात नसल्याने दोन्ही पक्षातील नवी पिढी या युतीकडे व्यवहारिकपणे पाहत आहे. सर्व बाबींत आम्हाला जास्त कळते अशी तो-यात वावरणारा भाजप यातही आघाडीवर आहे.
तर, आपण पाहूया मागील 25 वर्षापासून अभेद्य असलेल्या युतीतील नेत्यांचा एकोपा... पाहा मोजकी छायाचित्रे....