आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैतापूर अणुप्रकल्प होणारच- मुख्यमंत्री; शिवसेनेचा विरोध कायम- देसाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/ मुंबई- देशाच्या व राज्याच्या विकासासाठी जैतापूरसारखे प्रकल्प झालेच पाहिजेच. राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. जैतापूर प्रकल्प आता खूप पुढे गेला आहे. त्यावरून आता माघार नाही. कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुप्रकल्प होईलच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे नेते व खासदार अनिल देसाई यांनी जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच राहील असे वक्तव्य केले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना छेडले असता त्यांनी हे मत मांडले. मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरात बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आता खूप पुढे गेला आहे. रद्द करण्याचा विषयच येत नाही. जैतापूर प्रकल्प सुरु करायचा किंवा रद्द करायचा याचा निर्णय चार वर्षापूर्वी झाला आहे. 80-90 टक्के प्रकल्पबांधितांना त्यांच्या जमिनीचा मोबादला मिळाला आहे. त्यामुळे यावरून माघारी फिरण्याचा प्रश्नच येत नाही. जैतापूर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पुढे जाईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज दुपारी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिवसेना जैतापूर प्रकल्पाच्या कायम विरोधात आहे व राहील असे सांगितले. मात्र, याचवेळी भाजप व शिवसेनेची युती आगामी काळात कायम राहील या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. याचबरोबर शिवसेनेशिवाय सत्तेचे वर्तुळ पूर्ण होत नाही हे भाजपला सांगण्यासही देसाई विसरले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...